logo

सुशोभीकरण कामांचे भूमिपूजन आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय Ajit Pawar यांच्या हस्ते झाले

श्रीवर्धन नगर परिषदेतर्फे पाणी पुरवठा योजना व #श्रीवर्धन बीच सुशोभीकरण कामांचे भूमिपूजन आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय Ajit Pawar यांच्या हस्ते झाले. त्याचसोबत त्यांनी तौक्ते चक्रीवादळ, कोव्हिडची परिस्थिती व नगर परिषदेच्या विकास कामांचे नियोजन पाहण्यासाठीही दौरा केला. यावेळी #रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. Aditi Tatkare , आ. Balaram Patil , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री. सुरेशजी लाड, आ. Aniket Tatkare तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

गेल्या वर्षी ३ जून रोजी निसर्गाने वरदान दिलेल्या श्रीवर्धन तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाने संपूर्णपणे उध्वस्त केले. ५ जून, २०२० रोजी या परिसराची पाहणी करत असताना उध्वस्त झालेली गावं, बाजारपेठ आणि नागरिकांचे झालेले हाल पाहून माझे अश्रू अनावर झाले होते. श्रीवर्धनमधील नागरिकांना श्रीवर्धन पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीने उभे राहील असे आश्वासन दिले होते. केंद्र सरकारने निकषांमध्ये थोडाही बदल न करुनही, तिप्पट मदत देण्याचे काम महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी केले. आणि आज निसर्ग चक्रीवादळाला एक वर्ष पूर्ण होत असताना श्रीवर्धन पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीने उभे राहिले पहायला मिळते, यासारखे दुसरे समाधान नाही. श्रीवर्धनच्या वैभवात अधिक भर घालण्याच्या दृष्टीकोनातून पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी मविआ सरकारच्या मदतीने पुन्हा ३० कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध केला. २००९ साली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या आशीर्वादाने मला राज्याचे अर्थमंत्री पद मिळाले तेव्हा या भागात मोठ्या प्रमाणावर बदल घडवण्याची भूमिका आम्ही हाती घेतली. बॅरिस्टर अंतुले साहेब यांनी पाहिलेले सागरी महामार्गाचे स्वप्न, तसेच हर्णे, जिवना आणि आगरदांडा या बंदरांची कामे व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची कामे यापुढे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याने पूर्ण होतील, असा विश्वास वाटतो.

17
14676 views
  
7 shares